158. विकासाच्या वाटेवरील भारत!
नमस्कार वाचकांनो..!
"जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे।
शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।"
यातूनच प्रेरणा घेत तीन वर्षांपूर्वी म्हणजेच दिनांक
'02 OCTOBER 2022' रोजी "विकासाच्या वाटेवरील भारत!" या संकल्पनेचा प्रारंभ केला होता. आज या संकल्पनेला तीन वर्षे पूर्ण होत आहेत.
या लेखमालेतून संवैधानिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, वैज्ञानिक अशा विविध क्षेत्रासंबधित शेकडो विषयांवर मी तार्किक, चिकित्सक अन् विश्लेषणात्मक लेखन सादर करीत आलोय. आपणही चार ते पाच मिनिटे वेळ वाचनासाठी देताय ही बाब देखील मला प्रेरणा देणारी ठरतेय.
'प्रकाशित केलेले लेख कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूने झुकलेले अथवा राजकारण करू पाहणारे मुळीच नाही. शासनाचे अनेक ध्येय-धोरणे उल्लेखनीय असतात तर काही धोरणे गफलतीची असू शकतात. तीच बाब समाजाला देखील लागू होते. समाजातही अनेक योग्य-अयोग्य बाबींचे मिश्रण असते. योग्य बाबींना/धोरणांना संमती देणे आणि अयोग्य बाबींवर/धोरणांवर टीका करणे, हीच भूमिका मी घेतलीय.'
प्रकाशित लेखांबद्दल -
या तीन वर्षांच्या काळात सातत्याने प्रत्येक रविवार मी लेख प्रकाशित केलेत. या लेखाला गृहीत धरल्यास एकूण '158' लेख प्रकाशित झालेत. एकत्रितपणे शेकडो विषयांवर जवळजवळ '28900' शब्दांचे (मराठी) लिखाण मी पार पाडलेय. या सर्व लेखांचे संकलन 'eBook' स्वरूपात उपलब्ध करून देत आहे.
"जनजागृतीचा हाती घेतलेला हा गाडा असाच सतत चालू असेल, याची तुम्हांस या लेखणीतून खात्री देत आहे."
तुम्हीदेखील या लेखांना डोळ्याआड न करता तुमचे 'चार-पाच मिनिटे' मला द्याल आणि शक्य झाल्यास हे लेख इतरांपर्यंत पोहोचवाल हीच अपेक्षा.
धन्यवाद..!
आपलाच,
~ सचिन विलास बोर्डे
37/1
विकासाच्या वाटेवरील भारत! | विकास की राह पर भारत! | India On The Path Of Development | Completed Three Years | Awareness
NEXT 🔹 PREVIOUS
Comments
Post a Comment